चिंतन उपाध्यायचे तुरुंगात "स्वातंत्र्या'वर चित्र 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

मुंबई - हायप्रोफाइल दुहेरी हत्याकांडातील आरोपी चिंतन उपाध्यायने कारागृहात "स्वातंत्र्य' या विषयावर चित्र काढले आहे. ते चित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट म्हणून देण्याचा कारागृह प्रशासन विचार करीत आहे. कारागृहातील कैद्यांची काढलेली चित्रे प्रदर्शनासाठी दिल्लीला पाठविली जातात; मात्र चिंतनने काढलेल्या उत्कृष्ट दर्जाच्या चित्रामुळे ते मुख्यमंत्र्यांना भेट देण्याचा विचार सुरू आहे. 

प्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार हेमा चिंतन उपाध्याय व तिचे वकिल हरिश भंबानी यांची कांदिवलीत डिसेंबरमध्ये हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी चौघा आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींच्या चौकशीत हेमाचे पती चिंतन उपाध्याय याला ताब्यात घेतले होते. या दुहेरी हत्येत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला कांदिवली पोलिसांनी अटक केली. 

चिंतन याला भायखळा कारागृहात ठेवले आहे. त्याने "स्वातंत्र्य' या विषयावर उत्कृष्ट चित्र काढले. चिंतनने झेब्राच्या चित्रातून स्वातंत्र्याची व्याख्या स्पष्ट केली असल्याचे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले. पाच फूट रुंद व पाच फूट उंच असे अप्रतिम चित्र झाले असल्याचे प्रशासनाचे मत आहे. दिल्लीतील प्रदर्शनासाठी महाराष्ट्रातून 25 छायाचित्रे पाठविण्यात येत आहे. त्यातून चिंतनचे चित्र वगळण्यात आले आहे. 

Web Title: mumbai news Chintan Upadhyay