नवी मुंबईत घरांचे अनेक पर्याय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

नवी मुंबई - बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबई (बीएएनएम) क्रेडाईतर्फे नवी मुंबईतील वाशीत आयोजित केलेल्या मालमत्ता प्रदर्शनाचे उद्‌घाटन अभिनेत्री करीष्मा कपूर आणि सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगरे - वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. येथे ग्राहकांसाठी घरांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सोमवारपर्यंत (ता. २९) हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. यात लहान घरापासून अगदी मोठी घरे आणि व्यावसायिक गाळेही आहेत. घरांसाठी कर्ज देणाऱ्या बॅंकांचेही येथे स्टॉल आहेत.   

क्रेडाई बीएएनएमचे हे १८ वे मालमत्ता प्रदर्शन वाशीतील सिडको एक्‍सिबिशन सेंटरमध्ये सुरू आहे. या प्रदर्शनात ८० हून अधिक स्टॉल आहेत. यात परवडणाऱ्या घरांचाही समावेश आहे. 

बीएएनएमचे माजी अध्यक्ष धर्मेंद्र कारिया, भूपेंद्र शहा, सरचिटणीस रसिक चव्हाण, देवांग त्रिवेदी, एम. सी. सन्नी, जिगर त्रिवेदी, वसंत भद्रा, मनीष भाटिया आदी पदाधिकारी आणि बांधकाम व्यवसायिक उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत राहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्हावा शेवा शिवडी लिंक रोड, जेएनपीटी महामार्ग यामुळे येथील रियल इस्टेटचा बाजार तेजित आहे. त्यामुळे नवी मुंबईत हक्‍काचे घर असावे, असे अनेकांना वाटते. ग्राहक नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन हे प्रदर्शन भरवले आहे.

या मालमत्ता प्रदर्शनात ३०० चौरस फुटांपासून १० हजार चौरस फुटांपर्यंतची घरे आहेत. या प्रदर्शनाला भेटी देणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
- हरिश छेडा, अध्यक्ष, क्रेडाई बीएएनएम

Web Title: mumbai news cidco home