मुंबईत गारवा; तापमान 16 अंश सेल्सियस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

मुंबई - राज्यात गारपीटीचा तडाखा सुरु असल्याने किनारपट्टी भागांमध्ये सध्या कुलिंग इफेक्ट दिसून येत आहे. मुंबईत कधी कमाल तर कधी किमान तापमाना चार अंशाने चढ-उतार दिसून येत आहे.

त्यामुळे सायंकाळच्या वातावरणात थंडगार वा-यांनी परतीच्या चाकरमान्याचा प्रवास सुखकर करुन ठेवला आहे. शनिवारपासून राज्यात कोकण वगळता जालना, अमरावती, जळगाव येथे गारपीटीच्या तडाख्याचा अनुभव येत आहे.

मात्र गारपीटीची सुरुवात होताच किनारपट्टीतील वातावरणही थंडावल्याचे दिसून येत आहे. रविवारी कमाल तापमान चार अंशाने घट झाली. सोमवारी कमाल तापमान पूर्ववत आले असले तरीही किमान चार अंशाने खाली आले. किमान तापमान सोमवारी सोळा पूर्णाक सहा अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. उद्याही कमाल तापमानात जास्त वाढ दिसून येणार नाही, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. कमाल तापमान तीस अंशापुढे उद्या गेले तरीही वातावरणात विशेष फरत जाणवणार नाही.

Web Title: mumbai news cold temperature