कोट्यातील जागांसाठी बाजार तेजीत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

मुंबई - मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन राबवण्यात येत आहे. महाविद्यालय व्यवस्थापनाच्या हातात असलेल्या इनहाऊस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यातील एक लाख 17 हजार 954 जागा रिक्त राहिल्या आहेत. या जागा अद्यापही भरण्यात येत असल्याने पहिल्या गुणवत्ता यादीत पसंतीचे महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून या जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी धावपळ सुरू आहे. या कोट्यातील जागांवर प्रवेश देण्यासाठी आता आर्थिक बाजार सुरू आहे. 

ऑनलाईन प्रवेशाच्या चौथ्या गुणवत्ता यादीपर्यंत सर्व कोट्यांतील प्रवेशप्रक्रिया सुरू ठेवण्यास शिक्षण उपसंचालक कार्यालयाने परवानगी दिली आहे. दर वर्षी कोट्यातील जागा मोठ्या प्रमाणात भरण्यात येतात. यंदा कोट्यातील प्रवेशासाठी एक लाख 37 हजार 814 जागा आहेत. यंदा पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईपर्यंत इनहाऊस, मॅनेजमेंट आणि अल्पसंख्याक या कोट्यांच्या प्रवेशासाठी केवळ 19 हजार 860 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. यंदा अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी कोट्यातील जागांवर अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिले नाहीत. पसंतीचे महाविद्यालय मिळावे यासाठी पालक ऑनलाईन प्रवेशावर अवलंबून राहिले. अनेकांना पसंतीचे महाविद्यालय न मिळाल्याने आता पालकांनी प्रवेशासाठी धावपळ सुरू केली आहे. 

विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भवितव्यासाठी पालक डोनेशन मोजण्यासही तयार झाल्याने विविध कोट्यांतील जागांचा भाव वधारला आहे. चौथ्या यादीपर्यंत हे प्रवेश देण्यात येणार असल्याने नामांकित महाविद्यालयांमध्ये कोट्यातील जागांचा बाजार वाढण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

इकडे लक्ष द्या! 
- पहिल्या गुणवत्ता यादीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल, शाखा बदलून हवी असेल तर असे विद्यार्थी सोमवार, 9 जुलैपर्यंत कोट्यातील जागेवर प्रवेश घेऊ शकतात. 
- पहिल्या यादीत 2 ते 30 पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना कोट्यातील प्रवेशप्रक्रिया सुरू असेपर्यंत प्रवेश घेण्याची मुभा आहे. 

Web Title: mumbai news college admission