मुंबईः 31 जुलैपर्यंत महाविद्यालयांच्या सुट्टयांमध्ये वाढ

नेत्वा धुरी
शुक्रवार, 28 जुलै 2017

मुंबई - निकालाची घाई, तीन दिवसांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मुंबई विदयापीठाने महाविद्यालयांना दिलेल्या सुट्टीत वाढ केली आहे. एकतीस जुलैपर्यंत कला, वाणिज्य, कायदा विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी संबंधित प्राध्यापकांना एकतीस जुलैपर्यंत वाढ दिली गेली आहे. 

मुंबई विद्यापीठात सर्वच शाखांच्या उत्तरपत्रिका नियंत्रणात असल्याचे खात्रीलायक वृत्त अद्यापही कोणाकडूनच दिले जात नाही. उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या असल्या तरीही बारकोड पद्धतीने या उत्तरपत्रिकांची जमवाजमव अधिक आव्हानात्मक ठरत आहे. सध्या विद्यापीठात त्याबाबतचे वातावरण दिसून येत आहे. दोन दिवसांत महत्त्वाच्या काही विषय़ांचे निकाल जाहीर होण्याचे आशादायी चित्र असले तरीही तांत्रिक अडचणींबाबत अद्यापही विद्यापीठाचे गोंधळजनक चित्र आहे. 

मॅरीट ट्रॅक कंपनीने अपलोडींग, लॉगिन आयडी, स्कॅनिंग प्रक्रियेत गोंधळ केल्याचे परीक्षा व मूल्यमापन विभागाचे प्रभारी संचालक दीपक वसावे यांनी मान्य केले. उत्तरपत्रिकांमधील पाने विविध ठिकाणी जाण्याबाबतही मॅरीट ट्रॅक कंपनीच जबाबदार असल्याचे ते म्हणाले. चाळीस पानांच्या एका उत्तरपत्रिकेसाठी तेवीस रुपये पन्नास पैसे मॅरीट ट्रॅक कंपनीला दिले गेले आहेत. मात्र या कामातील पैसे अद्यापही मॅरीट ट्रॅक कंपनीला दिले गेले नाहीत. 

मॅरीट ट्रॅक कंपनीलाच पूनर्परिक्षांच्या फॉटोकॉपीचेही कंत्राट दिले गेले आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रिया संपल्यानंतरच मॅरीट ट्रॅकविषयी मुंबई विद्यापीठाकडून कडक पावले उचलली जातील, अशी चर्चा सुरु आहे.

Web Title: mumbai news college holiday