"संपूर्ण गणित'मुळे महाविद्यालयांना फटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

मुंबई - दहावीत सामान्य विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमबाह्य प्रवेश देत संपूर्ण गणित विषय देणाऱ्या महाविद्यालयांना चांगलाच फटका बसणार आहे. महाविद्यालयांच्या या चुकीचा फटका विद्यार्थ्यांना बसला नाही. त्यामुळे 298 विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

अकरावी प्रवेशाची अट न पाळल्याने तब्बल शंभर महाविद्यालयांना मुंबई विभागीय मंडळाने गेल्या आठवड्यात चांगलाच दणका दिला. सरसकट विद्यार्थांना प्रवेश देऊन त्यांना संपूर्ण गणित विषय दिल्याने "कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली. केवळ 60 महाविद्यालयांनी आतापर्यंत नोटिशीला उत्तर दिले आहे. हे प्रकरण राज्य मंडळाकडे सुपूर्त केलेले आहे. मंत्रालयीन पातळीवर याबाबतचा अंतिम निर्णय होईल; परंतु या महाविद्यालयांवर कारवाई अटळ असल्याचे मुंबई विभागीय मंडळाने स्पष्ट केले आहे. महाविद्यालयांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत.

Web Title: mumbai news college loss by total maths exam