इंधन दरवाढीविरोधात  काँग्रेस आक्रमक

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 जानेवारी 2018

मुंबई - देशात आणि राज्यात दररोज पेट्रोल डिझेलदराचा भडका उडाला असताना या दरवाढीमुळे सर्वसामान्यांची लूट सुरू असून, काँग्रेस पक्ष या दरवाढीविरोधात २९, ३० व ३१  जानेवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

आज टिळक भवन दादर येथे काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीसह विविध विषयांवर चर्चा झाली. गेल्या एका वर्षात गॅसच्या किंमती १९ वेळा वाढल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती रोज वाढवल्या जात आहेत. आज राज्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८० रुपयांच्या वर गेला आहे, तर डिझेल दर ७० रुपये प्रतिलिटरवर पोचला आहे. राज्यात इंधनावर वॅटसह विविध प्रकारचे सरचार्ज लावले जात आहेत. पेट्रोल, डिझेलवर दुष्काळाच्या नावाखाली कर लावून लूट सुरू आहे. सरकारने पेट्रोल, डिझेलला जीएसटीत अंतर्भुत करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.

Web Title: mumbai news congress Fuel price