मंत्रालयाच्या दारात कॉंग्रेसचे पकोडा आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

मुंबई - तरुणांनी बेरोजगार राहण्यापेक्षा भजी (पकोडे) विकणे चांगले, असे मत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काल राज्यसभेतील भाषणात व्यक्त केले होते. त्याचा निषेध म्हणून मुंबई कॉंग्रेस मंत्रालयाच्या दारात पकोडे तळण्याचे आंदोलन करणार आहे.

मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले की, बेरोजगार तरुणांनी भजी विकण्याचे स्टॉल टाकावेत, असे आवाहन केले आहे. त्यानुसार काही बेरोजगार तरुण उद्या दुपारी 3 वाजता, मंत्रालयासमोर भजी विकण्याचे स्टॉल सुरू करणार आहेत. हे बेरोजगार तरुण पदवी प्रमाणपत्राची झेरॉक्‍स प्रत सोबत घेऊन येणार आहेत.

Web Title: mumbai news congress pakoda agitation