काँग्रेस प्रवक्ते महादेव शेलार यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

मुंबई- काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार यांनी आज (शनिवार) गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. महादेव शेलार यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

शेलार यांनी मुलुंडमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारासाठी त्यांना तत्काळ मुलुंडमधील फोर्टीस रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात शेलार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

महादेव शेलार हे वकील होते. काँग्रेसची बाजू प्रभावीपणे मांडणारे नेते म्हणून महादेव शेलार यांची ओळख होती.

Web Title: mumbai news Congress spokesman Mahadev Shelar suicide