मुंबईत कोट्यवधींची बांधकामे ठप्प

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मुंबई - नव्या बांधकामांवर बंदी असल्याने मुंबईत दीड वर्षांत 50 हजार कोटींची बांधकामे ठप्प झाली आहेत. परिणामी, घरांच्या किमती वाढण्याची शक्‍यता आहे. त्यात मुलुंड आणि देवनार डम्पिंग ग्राउंडचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी उच्च न्यायालयाने एक महिन्याची मुदतवाढ दिल्याने बांधकामबंदी एक महिन्याने वाढणार आहे.

कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावण्याची यंत्रणा महापालिकेकडे नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील नव्या बांधकामाला फेब्रुवारी 2016 मध्ये स्थगिती दिली. त्यानंतरही वर्षभरात पालिकेचा डम्पिंगचा प्रश्‍न सुटू शकला नाही. बांधकामबंदी मार्च 2016 पासून लागू आहे. पालिकेने याबाबत तत्काळ तोडगा काढायला हवा, असे नॅशनल रिअल इस्टेट कौन्सिलचे पश्‍चिम क्षेत्र उपाध्यक्ष राजन बांदेकर यांनी सांगितले; तर या बंदीमुळे 50 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. ही परिस्थिती बदलली नाही, तर त्याचा परिणाम घरांच्या किमतीवर होऊन ती 10 ते 15 टक्‍क्‍यांनी महागण्याची शक्‍यता बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे आनंद गुप्ता यांनी वर्तविली.

Web Title: mumbai news construction stop in mumbai