कंत्राटी कामगारांचा ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

तुर्भे - महापालिकेच्या विविध विभागांतील कंत्राटी कामगारांनी सोमवारी (ता. २१) पालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून किमान वेतन आणि थकबाकीचे पैसे देण्याची मागणी केली. समाज समता कामगार संघाच्या नेतृत्वाखाली कंत्राटी कामगारांनी सकाळपासून मुख्यालयासमोर ठिय्या दिला. त्यात शेकडो कामगार सहभागी झाले होते. या वेळी कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान आंदोलनात भाग घेतलेल्या कामगारांचा एक दिवसाचा पगार कापण्याची धमकी कंत्राटदाराने दिल्याचा आरोप कामगारांनी केला.

महापालिकेच्या आरोग्य, पाणीपुरवठा, सफाई, मलनिःसारण, कचरा वाहतूक आणि इतर विभागांतील सहा हजार ५०० कंत्राटी कामगार अनेक वर्षांपासून मागण्यांसाठी लढा देत आहेत. किमान वेतन धोरणानुसार वेतन मिळावे, याच धोरणानुसार २०१५ पासून फरकाचे पैसे मिळावेत, कंत्राटदारांच्या जाचातून सुटका करावी, या मागण्यांकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी सफाई कामगारांनी बेलापूर येथील मुख्यालयासमोर धरणे धरले. सफाई कामगारांच्या कामांची बिले वेळेवर काढली जात नसल्याने वर्षभरापासून वेळेवर पगार मिळत नाही. प्रत्येक मागणीसाठी आंदोलन करावे लागत आहे, असा आरोप संघटनेने केला. या आंदोलनात कामगारांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. 

नवी मुंबई शहराला स्वच्छतेत देशात आठवे मानांकन मिळाले. त्यात सफाई कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. असे असताना संघर्ष आमच्या पाचवीला पुजला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आंदोलनात सामील झालेल्यांचा एक दिवसाचा पगार कापण्याचे पत्रक पालिकेने काढले आहे. अशा धमक्‍यांना आम्ही भीक घालणार नाही, असे समाज समता संघाने म्हटले आहे.

Web Title: mumbai news Contract Workers