नोटबंदीने देशाची फसवणूक केली : पी. चिदंबरम

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 10 सप्टेंबर 2017

मुंबई: बनावट चलनी नोटा, दहशतवाद, काळ पैसा रोखणे यापैकी नोटाबंदीचा एकही उद्देश सफल झाला नाही. नोटबंदीने देशाची प्रचंड मोठी फसवणूक झाली असून उद्योग, व्यवसाय, रोजगार यांच्यावर विपरीत परिणाम झाला. तर देशाच्या अर्थव्यवस्थेची हानी झाल्याची टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदमंबरम यांनी केली.

कॉंग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, नोटाबंदीनंतर 2017 या वर्षात काश्‍मीर मध्ये दहशतवादी हल्ले आणि मृत्यूमुखी पडलेल्या जवानांच्या संख्येत मोठी वाढ झाली. काळ्या पैशाचा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने तामिळनाडूच्या आर के नगर मतदारसंघातली निवडणूक निवडणूक आयोगाने रद्द केली

या निवडणूकीत वापरलेला पैसा काळ होता की पांढरा? भाजपने देशात अनेक सभा घेतल्या त्या सभांचा खर्च चेकने केला का? असा सवालही चिदंबरम यांनी केला.
नोटाबंदीमुळे विकासदर 2 टक्के ने कमी होईल असे डॉ. मनमोहन सिंग म्हणाले होते ते खरे ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता भारत ही जगात सर्वात वेगाने वाढणारी व्यवस्था राहिली नाही, अशी खंत व्यक्त करत नोटाबंदीवर 21000 कोटी खर्च झाले. हे सरकारच्या नोटबंदीचे मोठे अपयश आहे. तरीही पंतप्रधान म्हणतात नोटाबंदी हा धाडसी निर्णय आहे. मात्र चुकीचे निर्णय घ्यायला धाडस लागत नाही, चुकीची जबाबदारी स्वीकारायला धाडस लागते, अशा शब्दात त्यांनी मोदीवर टीका केली.

Web Title: mumbai news The country has cheated the nota bandi says p Chidambaram