खटल्यातील आणखी तीन साक्षीदार फितूर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

मुंबई - गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख चकमक खटल्यात गुरुवारी आणखी तीन साक्षीदारांनी विशेष सीबीआय न्यायालयात आपला जबाब फिरवल्यामुळे त्यांना फितूर घोषित करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणातील एकूण 33 आरोपी फितूर झाले आहेत.

मुंबई - गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख चकमक खटल्यात गुरुवारी आणखी तीन साक्षीदारांनी विशेष सीबीआय न्यायालयात आपला जबाब फिरवल्यामुळे त्यांना फितूर घोषित करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणातील एकूण 33 आरोपी फितूर झाले आहेत.

विशेष सीबीआय न्यायालयात अभियोग पक्षाच्या वतीने साक्षीदारांचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. सोहराबुद्दीनला अहमदाबादमधील ज्या शेतघरामध्ये ठेवण्यात आले होते, त्या घराचा ठावठिकाणा ओळखण्यास तिन्ही पंच साक्षीदारांनी नकार दिला. त्यामुळे त्यांना फितूर जाहीर करण्यात आले. या ठिकाणी आम्ही कधी गेलो नाही, आम्हाला फक्त पंचनाम्यावर सही करायला सांगितले, असे साक्षीदारांनी सांगितले. दरम्यान, या खटल्यातील राजस्थानमधील पोलिस अधिकारी एम. एन. दिनेश यांना पुरेशा पुराव्याअभावी विशेष न्यायालयाने दोषमुक्त केले, असा दावा त्यांच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला. ""राजस्थानमधून प्रशिक्षणासाठी मी गुजरातमध्ये होतो आणि माझा या प्रकरणाशी कोणताही सहभाग नाही. माझ्याबरोबर असलेल्या कनिष्ठ पोलिसांना दोषमुक्त केले नाही, कारण त्यांच्यावर गोळीबार केल्याचा थेट आरोप आहे,'' असे दिनेश यांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. "सीबीआय'नेही दिनेश यांच्याविरोधात पुरावे नसल्याचा दावा या वेळी केला. दहशतवादी कारवायांमध्ये सोहराबुद्दीन आरोपी असल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला आहे. 2005 मध्ये त्याची बनावट चकमकीत हत्या केल्याचा आरोप त्याच्या भावाने याचिकेत केला आहे.

Web Title: mumbai news court witness