"पोकर गेम'च्या संचालकाला खंडणीसाठी धमकी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

मुंबई - पोकर गेम कंपनीचे संचालक अमिन रोझानी यांच्याकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी एकाला अटक केली. इरफान मेमन (36, रा. वांद्रे) असे अटक आरोपीचे नाव आहे. फहीम मचमचच्या नावाने त्याने परदेशातून दूरध्वनी करून तसेच व्हॉट्‌स ऍपवरून व्हॉईस संदेश पाठवून ही धमकी दिली होती. 

अमिन यांच्या मोबाईलवर गेल्या वर्षी 29 डिसेंबरला प्रथम धमकीचे दूरध्वनी आले. पण ते दूरध्वनी पाकिस्तानातून आले असल्याने त्यांनी ते उचलले नव्हते. त्यानंतरही दूरध्वनी येत असल्यामुळे त्यांनी फोन स्पिकरवर ठेऊन ते रेकॉर्ड केले होते. दूरध्वनीवरून बोलणारी व्यक्ती 50 लाख रुपयांची खंडणी मागत असे. सुरुवातीला अमिन यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर आरोपीने 29 डिसेंबरपासून अमिन यांच्याशी व्हॉट्‌स ऍप, व्हॉईस मेसेज, टेक्‍ट मेजेस तसेच दूरध्वनीच्या माध्यमातून 13 वेळा संपर्क साधत धमकावले. 30 जानेवारीला अमिन आपल्या घराच्या कंपाऊंमधून कार घेऊन बाहेर पडत असताना एक व्यक्ती त्यांच्या कारच्या नंबर प्लेटचे छायाचित्र काढत असल्याचे तेथील सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. त्याने अमिन यांना ही माहिती दिल्यानंतर अमिन यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. हे प्रकरण खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आले. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मेमनला अटक करण्यात आली. अमिन यांच्या कारच्या नंबर प्लेटचे छायाचित्रही त्यानेच काढल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्याविरोधात 80 गुन्हे दाखल आहेत. 

मेमनच्या भावाशी अमिन यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे अमिन यांना त्रास दिल्यास भावालाही त्रास होईल, या उद्देशाने त्याने फहीम मचमचला अमिन यांची माहिती दिल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. अमिन यांना पाकिस्तान आणि दुबईतून दूरध्वनी आल्याचे प्राथमिक तपासानुसार वाटत आहे; पण ते खरोखरच परदेशातून आले, की मेमनने तंत्रज्ञानाच्या आधारे ते केले, याचा तपास पोलिस करत आहेत.

Web Title: mumbai news crime

टॅग्स