पुतण्याच्या हत्येप्रकरणी काकीला अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जुलै 2017

मुंबई - संपत्तीच्या वादातून आपल्या दोन वर्षांच्या पुतण्याची हत्या केल्याप्रकरणी मालाड येथील महिलेला गुरुवारी (ता. 29) अटक करण्यात आली. इंदू गुप्ता असे तिचे नाव आहे. तिला सात जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

मालाड काचपाडा परिसरात राहणाऱ्या कुंदू दाम्पत्याचा मुलगा विवान सोमवारी (ता. 26) घराबाहेर खेळत होता. तो बेपत्ता झाल्याने त्याच्या नातेवाइकांनी मालाड पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी श्‍वानपथकाद्वारे काचपाडा परिसरात शोध मोहीम राबवली. मंगळवारी पहाटे त्याचा मृतदेह बॅगेत आढळला. पोलिसांनी इंदुला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तांत्रिक माहितीच्या आधारे तिला गुरुवारी अटक करण्यात आली. तिने विवानची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. 

Web Title: mumbai news crime

टॅग्स