फसवणूकप्रकरणी दलालांविरुद्ध तक्रार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

नवी मुंबई - ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक आणि वाशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची बदनामी केल्याप्रकरणी दोन दलालांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

नेरूळ सेक्‍टर २२ मधील नागेश्‍वर दत्त यांनी आरसी बुकवरील पत्ता बदलून घेण्यासाठी ते वाशीतील एजंट भरत राजपूत यांच्याकडे दिले होते; मात्र दोन महिने झाले तरीही आरसी बुक मिळाले नाही. 

याविषयी त्यांनी राजपूतला विचारले असता, कागदपत्रे वाशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दिली आहेत; परंतु त्यांच्याकडून उशीर होत आहे, असे त्याने सांगितले. त्यामुळे दत्त यांनी परिवहन कार्यालयाला मेल पाठवला. तेव्हा त्यांची कागदपत्रे तेथे आली नसल्याचे उघड झाले. नंतर राजपूतने ही कागदपत्रे मुकुल या दुसऱ्या एजंटकडे दिली असल्याचे सांगितले. 

या प्रकाराची दखल घेऊन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी या दोन्ही एजंटविरोधात फसवणूक आणि परिवहन कार्यालयाची बदनामी केल्याप्रकरणी तक्रार नोंदवली.

Web Title: mumbai news crime

टॅग्स