नोकरीचे प्रलोभन दाखवून फसवणारी टोळी गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मुंबई - नोकरीच्या प्रलोभनाने उत्तर प्रदेशातील तरुणांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अंधेरी पोलिसांनी नुकत्याच बेड्या ठोकल्या. 

अमित देवदत्त पाटोळे, अमरदीप अरुण चौहाण ऊर्फ हरिष राठोड, सर्फराज मोहम्मद फसाहत अली शेख ऊर्फ आसिफ, अब्दुल सलाम गुलजार अहमद अन्सारी ऊर्फ मेहंदी हसन जाफर रजा अशी या टोळीतील चौघांची नावे आहेत. त्यांनी दिल्ली, उत्तर प्रदेश, नवी मुंबई आणि मुंबईत अनेकांची फसवणूक केल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. 

ही टोळी उत्तर प्रदेशात परदेशी नोकरी लावण्याच्या जाहिराती देत असे. त्यासाठी ते तरुणांकडून हजारो रुपये घेत असत. तीन वर्षांपूर्वी या टोळीने अंधेरीत 180 जणांची फसवणूक केली होती. 1 कोटी 16 लाख रुपये रुपये घेऊन पोबारा केला होता. दोन वर्षांपूर्वी कांदिवलीमध्येही या टोळीने 500 जणांना एक कोटी 50 लाखांना फसवले होते. या टोळीचे मालाड परिसरात ऑरबीस इंटरनॅशनल नावाचे कार्यालय होते. परिमंडळ 10 चे उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक पंडित थोरात, पोलिस निरीक्षक राजेश पाडवी यांच्या पथकाने फसवणूक करणाऱ्या टोळीला जेरबंद केले. 

Web Title: mumbai news crime