अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी एकास जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

मुंबई - चार वर्षांपूर्वी खंडणीसाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला गुरुवारी (ता. 12) सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

मुंबई - चार वर्षांपूर्वी खंडणीसाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला गुरुवारी (ता. 12) सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

दक्षिण मुंबईत राहणाऱ्या आदित्य रांका (वय 13) या मुलाचे अपहरण मे 2013 मध्ये झाले होते. पोलिसांनी या प्रकरणात त्याच्या चुलत भावासह अन्य एकाला अटक केली होती. न्यायाधीश एस. आगरवाल यांनी आरोपी व्रिजेश संघवीला शिक्षा सुनावली. हत्या आणि अपहरणाच्या आरोपामध्ये त्याला जन्मठेप सुनावली असून खंडणी आणि पुरावे नष्ट करणे यासाठी प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे पहिल्यांदा सात वर्षांची शिक्षा आरोपीला भोगायची असून जन्मठेपेची शिक्षा त्यानंतर सुरू होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच नऊ लाख रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे. ही रक्कम मुलाच्या आईला देण्याचे आदेश न्यायालायने दिले. दुसरा आरोपी हिमांशू राकाला न्यायालयाने पुराव्याअभावी दोषमुक्त केले. कर्जबाजारी झाल्यामुळे हिमांशूने खंडणी आणि अपहरणाचा बनाव केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला होता. मात्र न्यायालयात आरोप सिद्ध झाला नाही. 

Web Title: mumbai news crime