मुलीला मारहाणप्रकरणी आरोपीला पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

मुंबई - नेहरूनगर येथे 16 वर्षांच्या मुलीला मारहाण केल्याप्रकरणी अटक केलेल्या इम्रान शेख याला सत्र न्यायालयाने 25 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. शनिवारी (ता. 21) याप्रकरणी विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कलमे वाढवण्यात आल्यानंतर आरोपीला पुन्हा ताब्यात घेण्यात आले होते.

नेहरूनगरमधील ओमकार बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या संबंधित पीडित मुलीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी शेखला अटक केली. मात्र, जखमी मुलीचा जबाब सविस्तर न नोंदवता पोलिसांनी निष्काळजी केली. घटना घडली त्या दिवशी पोलिसांनी रात्री आठ वाजेपर्यंत मुलीच्या कुटुंबीयांना बसवून ठेवले होते. त्यानंतर मध्यरात्री गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल करताना घडलेल्या घटनेचा सविस्तर जबाब नोंदवला गेला नसल्याचा आरोप पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी केला, त्यामुळेच आरोपीला जामीन मिळाल्याचे सांगण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर पोलिस खडबडून जागे झाले.

अनेक दिवसांपासून इम्रान पीडित मुलीकडे पाहून अश्‍लील शेरेबाजी करायचा. याबाबत इम्रानच्या कुटुंबीयांनाही मुलीच्या नातेवाइकांनी कल्पना दिली होती. मात्र, त्यांनीच उलट अरेरावी केल्याचे पीडित मुलीच्या नातेवाइकांनी सांगितले. तक्रार मागे घेण्यासाठीही धमकावले जात असल्याचे मुलीच्या नातेवाइकांनी सांगितले.

Web Title: mumbai news crime