अश्‍लील चित्रफित पाठवणाऱ्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

मुंबई - सोशल नेटवर्किंग साइटवर झालेल्या ओळखीनंतर विद्यार्थिनीला अश्‍लील चित्रफित पाठवणाऱ्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुजरातहून अटक केली.

मुंबई - सोशल नेटवर्किंग साइटवर झालेल्या ओळखीनंतर विद्यार्थिनीला अश्‍लील चित्रफित पाठवणाऱ्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुजरातहून अटक केली.

पीडित विद्यार्थिनी ही अंधेरी परिसरात राहते. सुरतच्या एका महाविद्यालयात शिकणाऱ्या युवकाशी तिची इन्स्टाग्रामवर तीन महिन्यांपूर्वी ओळख झाली. तरुणाने पीडित विद्यार्थिनीला अश्‍लील छायाचित्रे आणि चित्रफीत इन्स्टाग्रामवर पाठवण्यास सुरवात केली. तिने या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी पोलिसांनी विनयभंग आणि पॉस्को कायद्याखाली गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेच्या पथकाने इन्स्टाग्रामवरील तांत्रिक माहितीच्या आधारावर गुजरातमधील आनंद करसमाड तेथून तरुणाला अटक केली.

Web Title: mumbai news crime

टॅग्स