मोबाईलचा आयएमईआय बदलणाऱ्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

मुंबई - चोरीच्या मोबाईलचे "आयएमईआय' क्रमांक बदलणाऱ्या शाहरूख अब्दुल्ला कयूम खान या तरुणाला दक्षिण मुंबईतील मुसाफिरखाना येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना आरोपीचा मोबाईल चोरांशी संबंध असल्याचा संशय आहे.

मुसाफिरखाना येथील एका मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात एक तरुण मोबाईलचे मूळ "आयएमईआय' क्रमांक संगणकातील सॉफ्टवेअरच्या मदतीने बदलतो, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त (दक्षिण प्रादेशिक परिमंडळ) प्रवीण पडवळ यांना मिळाली होती. त्यानुसार डीबी मार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग पाटील व त्यांच्या पथकाने छापा घातला. त्या वेळी शाहरूख "आयएमईआय' क्रमांक बदलत असल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक करण्यात आली.

Web Title: mumbai news crime