सिद्दीकींवरील कारवाई आकसापोटी - कॉंग्रेस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

मुंबई - कॉंग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्यावरील ईडीचे छापे म्हणजे भाजप सरकारची आकसापोटी कारवाई असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. सिद्दीकी यांच्याबाबत संबंधित तक्रारदाराने यापूर्वी अनेकदा तक्रार केल्या होत्या. त्यावर न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी चौकशी केली. मात्र, त्यात काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयात बी समरी अहवाल सादर करून तक्रारीमधील सर्व आरोप फेटाळल्याचा अहवाल सादर केला होता. असे असतानाही ईडीने मात्र याच तक्रारीचा हवाला घेत थेट छापे घातले आहेत. हे अनाकलनीय असून, केंद्राच्या इशाऱ्याने ही कारवाई सुरू असल्याची टीका सावंत यांनी केली.
Web Title: mumbai news crime on baba siddhiki