अभिनेत्रीशी असभ्य वर्तन करणाऱ्याला जामीन मंजूर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

मुंबई - विमान प्रवासात अल्पवयीन अभिनेत्रीशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप असलेल्या विकास सचदेवा याला बुधवारी अंधेरी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.

मुंबई - विमान प्रवासात अल्पवयीन अभिनेत्रीशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप असलेल्या विकास सचदेवा याला बुधवारी अंधेरी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.

आरोपी सचदेवा आणि त्याच्या कुटुंबीयांनी प्रसिद्धिमाध्यमे आणि सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करू नये, असेही निर्देश न्यायालयाने दिले. दिल्ली-मुंबई विमान प्रवासात आरोपीने आपल्याशी असभ्य वर्तन केले होते, असा व्हिडिओ अभिनेत्रीने प्रसारित केला होता. त्यानंतर पोलिसांनी याची दखल घेत आरोपीला अटक केली. न्यायालयाने 25 हजारांच्या जातमुचलक्‍यावर आरोपीला जामीन मंजूर केला. हे कृत्य गैरसमजुतीतून झाल्याचा दावा सचदेवाच्या पत्नीने केला आहे.

Web Title: mumbai news crime & bell approved