बायोटेक कंपनीच्या खात्यातून दीड कोटीची ऑनलाइन चोरी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

मुंबई - सराफाच्या दक्षतेमुळे कोट्यवधी रुपयांची ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार उघडकीस आली आहे. एका बायोटेक कंपनीच्या खात्यातून दीड कोटी रुपये ऑनलाइन काढल्याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. 

मुंबई - सराफाच्या दक्षतेमुळे कोट्यवधी रुपयांची ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार उघडकीस आली आहे. एका बायोटेक कंपनीच्या खात्यातून दीड कोटी रुपये ऑनलाइन काढल्याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. 

रोहित विजय पवार (26, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. विलेपार्लेतील मंगल ज्वेलर्समध्ये तो 20 लाख रुपयांचे सोने खरेदी करण्यासाठी आला होता. या ज्वेलर्सच्या खात्यावर त्याने 20 लाख रुपये आरटीजीएसद्वारे जमा केले होते. पवार याच्या संभाषणावरून सराफाला त्याच्या व्यवहाराविषयी संशय आला. त्यांनी बॅंकेला दूरध्वनी करून या प्रकाराची माहिती दिली. बॅंक कर्मचारी सराफाच्या दुकानात आल्यानंतर पवारचे बिंग फुटले. चौकशीत त्याने साथीदार अशोक शेट्टी याच्या मदतीने त्याच बॅंक खात्यातून आरटीजीएसद्वारे तीन व्यवहार करून एक कोटी 45 लाख रुपये काढल्याचे उघड झाले. 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुकेश जैन हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. ते एका बायोटेक कंपनीसाठी काम करतात. या मुख्य कंपनीच्या तीन कंपन्यांचे बॅंक व्यवहार जैन यांच्या मोबाईलवरून केले जातात. जैन यांचा मोबाईल गुरुवारी (ता. 31) अचानक बंद पडला. त्यामुळे कंपनीच्या बॅंक खात्यातून आरटीजीएसद्वारे एक कोटी 45 लाख रुपये काढल्यानंतरही त्यांना त्याचा एसएमएस आला नाही; परंतु केवळ सराफाच्या दक्षतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. 

Web Title: mumbai news crime Biotech Company