एक्‍स्प्रेस गाड्यांमध्ये चोरी करणारा अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

मुंबई - कोकण रेल्वेत चोऱ्या करणाऱ्याला पनवेल रेल्वे पोलिसांनी गजाआड केले आहे. उमेश मालोजी कांबळे असे त्याचे नाव आहे. चोरी करण्यासाठी तो सिंधुदुर्गातून विनातिकीट प्रवास करून पनवेल-रोहा परिसरात येत असे. त्याच्याकडून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. 

उमेश हा मूळचा सिंधुदुर्गचा आहे. त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. गतवर्षापासून तो पनवेलहून कोकणात जाणाऱ्या एक्‍स्प्रेस रेल्वे गाड्यांमध्ये चोरी करू लागला. गाडी रात्री पनवेल-रोहादरम्यान असताना उमेश रेकी करायचा. खिडकीजवळ बसलेल्या महिलांना तो लक्ष्य करायचा. संधी मिळताच त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, मंगळसूत्र खेचून पळ काढायचा. जुलैमध्ये पनवेल रेल्वे पोलिस ठाण्यात सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान पोलिसांनी स्थानकातील सीसीटीव्हीतील चित्रीकरण तपासले. त्यातूनही काही हाती लागले नाही. सीसीटीव्हीत आपला चेहरा दिसू नये म्हणून उमेश खबरदारी घेत होता. पोलिसांनी काही संशयितांची चौकशीही केली. अखेर एका खबऱ्याने पोलिसांना माहिती दिली. उमेश हा पनवेल स्थानकात चोरी करण्यासाठी आला होता. तेव्हा पोलिसांनी त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान उमेश याने चोरीची कबुली दिली आहे. उमेशच्या कबुलीमुळे पाच गुन्ह्यांची उकल झाली आहे, असे पोलिस उपायुक्त (मध्य रेल्वे) समाधान पवार यांनी सांगितले. एक्‍स्प्रेसमधून चोरलेले सोन्याचे दागिने उमेश हा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग येथील ज्वेलर्सच्या दुकानात विकत होता. 

Web Title: mumbai news crime express train panvel police