सव्वा कोटींच्या सोने तस्करीत सहा जणांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

मुंबई - हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) तीन दिवसांत सहार विमानतळावर सोने तस्करी करणाऱ्या एका महिलेसह सहा जणांवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे सव्वा कोटी रुपयांचे 4 किलो 316 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. 

सहार विमानतळावर सोने तस्करीच्या प्रकारात वाढ झाली आहे. दुबईहून सोमवारी आलेल्या दीपककुमार शेटा याच्या सामानाची एआययूच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली. त्या वेळी त्याच्याकडून 21 लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले; तर मंगळवारी सोने तस्करीच्या चार घटना उघड झाल्या. या प्रकरणी रियाज मोहमंद, रेखा श्रीचंद तलरेजा, मोहमंद रशिद वेन्नात्रे वाल्लापील आणि अब्दुल माजिद पालिकरे यांना ताब्यात घेतले. रियाजकडून 21 लाख, रेखाकडून 24 आणि मोहम्मद आणि अब्दुलकडून 51 लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. आरिफ मोहम्मद खान याच्याकडून बुधवारी 14 लाख रुपयांचे सोन जप्त केले. त्याने मोबाईलच्या बॅटरीबॉक्‍समध्ये सोने लपविले होते. दुबईतील एका तस्कराने सोने दिले असल्याचा दावा आरिफने केला. या प्रकरणी त्याची कसून चौकशी केली जात आहे. 

Web Title: mumbai news crime gold

टॅग्स