चपलातून सोने तस्करी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

मुंबई - चपलातून तस्करी करणाऱ्याला हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) रविवारी (ता. 11) अटक केली. मोहम्मद सुफियान निझामुद्दीन असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 14 लाख 50 हजार रुपयांचे सोने जप्त केले आहे. चेन्नईतील तस्कारासाठी सोने नेत असल्याचे त्यांनी सांगितले. "एआययू'ने तीन दिवसांत 69 लाखांचे सोने जप्त केले आहे. 

विमानतळावर एआययूचे उपायुक्त जुमळे शनिवारी रात्री गस्तीवर होते. मोहम्मद हा कोलंबोहून विमानाने आला. विमानतळावर प्रवेश करताच त्याने अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू केली. तेव्हा मोहम्मद याच्याबाबत संशय आल्याने त्याच्या चपलेची झडती घेण्यात आली. त्यातून 14 लाख 50 रुपये किमतीच्या सोन्याच्या लडी सापडल्या. त्याच्या चौकशीत मोहम्मद हा भारतात कपडे विकत घेऊन ते श्रीलंकेत विकतो. काही दिवसांपूर्वी तो चेन्नईत गेला होता. तेथील तस्कराने चपलेत सोने लपवून नेण्यास सांगितल्याचे त्याने सांगितले. सोने तस्करीप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इरिडियम पॉवडर जप्त 
हॉंगकॉंगहून आलेल्या महिलेकडून सात लाखांची इरिडियम पावडर जप्त करण्यात आली आहे. दागिने बनवताना या पावडरचा वापर सराफ करतात. तर शुक्रवारी (ता. 9) रात्री विजय जगदीश आणि मुफतलाल यांच्याकडून 54 लाखांचे सोने जप्त केले आहे. ते बॅंकॉक येथून आले होते. त्यांनी विमानातल्या आसनाखाली सोने लपवले होते.

Web Title: mumbai news crime Gold smuggling

टॅग्स