हॉटेलमध्ये तोडफोडप्रकरणी "स्वाभिमान'च्या आठ जणांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

मुंबई - स्वाभिमान या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री (ता. 10) वर्सोवा परिसरातील एका कॅफेमधील हुक्का पिणाऱ्यांना पिटाळून लावत तोडफोड केली. तोडफोड करणे, तसेच धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी आमदार नीतेश राणे यांच्यासह 12 जणांविरोधात गुन्हा नोंदवला असून, आठ जणांना अटक केली आहे. त्यांना शुक्रवारी (ता. 12) न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

कमला मिल कंपाउंडमधील आगीच्या घटनेनंतर शहरातील हुक्का पार्लरचा प्रश्‍न पुढे आला आहे. या प्रकरणात काही राजकीय पक्षांनी उडी घेतली. "स्वाभिमान'च्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री सिरोको कॅफेमध्ये घुसत तेथे हुक्का पिणाऱ्यांना पिटाळून लावले. घोषणाबाजी व कॅफेतील कामगारांना शिवीगाळ करत तोडफोड केली. तक्रारदार कौशल शहा यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वर्सोवा पोलिस घटनास्थळी पोचले; मात्र तोपर्यंत हे कार्यकर्ते पळून गेले होते. पोलिसांनी हॉटेलमधील तांत्रिक बाबी तपासल्यानंतर "स्वाभिमान'च्या कार्यकर्त्यांविरोधात दंगलीचा गुन्हा नोंदवत आठ जणांना अटक केली. 

Web Title: mumbai news crime Hotel Breakdown Case