हॉटेल, पबविरोधातील कारवाई सुरूच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

मुंबई - कमला मिल कम्पाऊंडमधील दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेने बेकायदा बांधकामे करणारी हॉटेल, पब आणि बारविरोधात सुरू केलेली मोहीम सोमवारी, तिसऱ्या दिवशीही सुरू होती. पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी लोअर परेल येथील रघुवंशी मिल परिसरातील शिशा उपाहारगृहासह ५३ ठिकाणची बेकायदा बांधकामे हटवली. मुंबईतील गाळ्यांतील बेकायदा बांधकामे हटवण्याबरोबरच तेथे अग्निसुरक्षेचे उपाय करण्यासाठी पालिकेने संबंधितांना १५ दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर पालिका पुन्हा कारवाई करण्यास सुरुवात करणार आहे.

पालिकेच्या पथकाने सोमवारी भायखळा, वरळी, लोअर परेल तसेच घाटकोपर येथील उपाहारगृहे, बार, पबची पाहणी केली.  दरम्यान, पालिकेने कारवाई केलेल्या तसेच इतर गाळ्यांमध्ये बेकायदा बांधकामे झाली असल्यास किंवा अग्निसुरक्षेचे उपाय नसल्यास १५ दिवसांत सर्व सुधारणा करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. संबंधितांनी या मुदतीत स्वतःहून बेकायदा बांधकाम काढून टाकवे; अन्यथा आम्ही कारवाई करू, असा इशारा पालिकेने दिला आहे. दरम्यान, व्यावसायिक गाळ्यांमध्ये अग्निसुरक्षेबाबत करावयाच्या उपायांबाबतची माहिती पालिकेने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.

Web Title: mumbai news crime on hotel pub