एटीएमचा पिन चोरून पैसे काढणाऱ्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मुंबई - एटीएम कार्डचा पिन क्रमांक चोरून एटीएममधून पैसे काढणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई - एटीएम कार्डचा पिन क्रमांक चोरून एटीएममधून पैसे काढणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी संदीप दुधवडकर यांनी तक्रार दिली आहे. दुधवडकर 10 जूनला एका एटीएम सेंटरमध्ये गेले. तेथे आधीच एक महिला आणि दोन तरुण होते. दुधवडकर यांनी एटीएममधून तीन हजार रुपये काढले. त्याचा संदेश त्यांना मोबाईलवर आला. काही वेळाने आणखी 10 हजार रुपये काढल्याचा संदेशही त्यांना आला. त्याच एटीएममधून त्यांच्या खात्यातून 10 हजार रुपयेही काढण्यात आले होते. सीसीटीव्हीच्या पडताळणीत दोन संशयित तरुण संदीप यांच्यामागे उभे राहून त्यांचा एटीएम पिन पाहत असल्याचे आढळले. याआधारे पोलिसांनी शैलेश शिवबहादूर मिश्रा (28) आणि शिवकुमार ऊर्फ राहुल अरुणकुमार मिश्रा (26) यांना अटक केली.

Web Title: mumbai news crime in mumbai