गोरेगाव हत्येप्रकरणी दोघे गजाआड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

मुंबई - गोरेगाव परिसरात झालेल्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने दोघांना गजाआड केले आहे. मोहंमद समीर नजीर शेख आणि कैसर पाशा सय्यद अशी त्यांची नावे आहेत. त्यांना दिंडोशी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गोरेगाव येथील मंत्री पार्कजवळ एका झुडुपात रविवारी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. सदाशिव पुजारी (वय 20) असे मृताचे नाव आहे. आरोपींनी मृताचा चेहरा दगडाने ठेचल्याने ओळख पटवणे मुश्‍कील झाले होते. दिंडोशी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
Web Title: mumbai news crime murder case