फॅशन स्ट्रीटवरील कारवाईला मनाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

मुंबई - चर्चगेट येथील फॅशन स्ट्रीटवरील स्टॉलधारकांवर कारवाई करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला तूर्तास मनाई केली आहे. त्यामुळे येथील विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई - चर्चगेट येथील फॅशन स्ट्रीटवरील स्टॉलधारकांवर कारवाई करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला तूर्तास मनाई केली आहे. त्यामुळे येथील विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे.

महापालिकेने येथील 50 हून अधिक विक्रेत्यांना जागा रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे. नियमांचे उल्लंघन करून येथे व्यवसाय केला जातो, असा आरोप पालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. याविरोधात विक्रेत्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेवर मंगळवारी (ता. 23) सुटीकालीन न्यायालयात सुनावणी झाली.

न्यायालयाने नोटिशीबाबत पालिकेला खुलासा करण्याचे निर्देश दिले. काही विक्रेते परवाना नसताना विक्री करत असून जादा जागा व्यापतात, असा पालिकेचा आरोप आहे. याचिकेवर नियमित न्यायालयात जूनमध्ये सुनावणी होणार आहे.

Web Title: mumbai news crime oppose on fashion street