ताडदेव आरटीओमध्ये दलालाला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

मुंबई - ताडदेव आरटीओ कार्यालयातील दलालांचा सुळसुळाट आणि दलालांशिवाय होत नसलेले काम या विरोधात अनेक तक्रारी परिवहन आयुक्‍तांकडे आल्या आहेत. त्याची दखल घेत बुधवारी दक्षता विभागाला कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. या वेळी कृष्णा साळवे या दलालाला पकडण्यात आले.  

साळवे हा पी. के. मोटर्सच्या कार्यालयात काम करतो. त्याने ड्युप्लिकेट लायसन्ससाठी ८०० रुपयांची लाच मागितली होती. त्यासाठी त्याने आगाऊ ३०० रुपये घेतले होते. पी. के. मोटर्सच्या व्हिजिटिंग कार्डवर ८०० रुपये असे लिहून ३०० रुपये मिळाल्याची नोंद केली होती. ड्युप्लिकेट लायसन्स बनवण्याचे शुल्क अवघे २६४ रुपये आहे. त्याच्याविरोधात ताडदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: mumbai news crime rto Taddeo RTO

टॅग्स