पवईत दोन मुलांवर लैंगिक अत्याचार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

मुंबई - पवईत दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. यापैकी एका मुलाने आत्महत्या केली. दुसऱ्यावर परळमधील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरवात केली असून, चार तपास पथके तयार केली आहेत. आतापर्यंत 50 हून अधिक जणांची पोलिसांनी चौकशी केली आहे. 

पीडित अल्पवयीन मुले पवई पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहतात. दोन्ही मुले घराबाहेर खेळत असत. एका व्यक्तीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. बदनामीच्या भीतीने दोन्ही मुलांनी 12 जुलैला कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना शीव येथील टिळक रुग्णालयात दाखल केल्यावर एका मुलाचा मृत्यू झाला. दुसऱ्या मुलावर परळमधील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असून त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. या मुलाच्या नातेवाइकांनी बुधवारी (ता.19) दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. 

मुलांसोबत अत्याचाराचा प्रकार नेमका कोठे घडला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुलगा शुद्धीवर आल्यानंतरच ही माहिती मिळू शकेल. त्याच्या आईचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. मृत मुलाच्या नातेवाइकांनी कोणतीही तक्रार अद्याप दाखल केलेली नाही. तपासासाठी पवई पोलिसांनी चार पथके तयार केली आहेत. त्यात महिलाही आहेत. या पथकांना आतापर्यंत ठोस माहिती मिळू शकलेली नाही. 

Web Title: mumbai news crime Sexual harassment