डिझेल चोरीप्रकरणी सहा जणांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

मुंबई - डिझेलच्या चोरीप्रकरणी शिवडी पोलिसांनी नुकतीच सहा जणांना अटक केली. यातील मुख्य आरोपी संतोष डिसोजा (वय 32) याने दारूखाना परिसरातून 2017 मध्ये नगरसेवकपदाची निवडणूक लढवली होती. 

मुंबई - डिझेलच्या चोरीप्रकरणी शिवडी पोलिसांनी नुकतीच सहा जणांना अटक केली. यातील मुख्य आरोपी संतोष डिसोजा (वय 32) याने दारूखाना परिसरातून 2017 मध्ये नगरसेवकपदाची निवडणूक लढवली होती. 

याप्रकरणी राजेश हरिजन (30), राकेश चव्हाण (30), कालूराम गौतम (31) व शंभू ऊर्फ सुनील कोळी (30) व मोटरमन सुमीत तिवारी यांना पोलिसांनी अटक केली आहे. समुद्रातील डिझेल चोरी आणि तस्करांविरोधात पोलिसांची कारवाई सुरू आहे. त्याअंतर्गत या आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींनी एव्हर पावर या जहाजातून हे डिझेल चोरले होते. वडाळा पूर्व येथील डिसोजाने 2017 मध्ये दारूखाना परिसरातील 209 प्रभागांतून अखिल भारतीय सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.

Web Title: mumbai news crime theft of diesel

टॅग्स