परदेशी महिलेचा विनयभंग; तरुणाला अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

मुंबई - परदेशी पर्यटक महिलेचा विनयभंग करून पळालेल्या सिराजुद्दीन अब्दुल सनादी या तरुणाला खार पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आणि अन्य तांत्रिक माहितीच्या अधारे ही अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

फ्रान्समधील महिलेने मुंबईतील काही पर्यटनस्थळांना भेट दिल्यानंतर ती बुधवारी रात्री एका परिचित महिलेच्या घरी जात असताना तेथे आलेल्या सिराजुद्दीनने तिचा विनयभंग केला. याबाबत तिने खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, सिराजुद्दीनने चौकशीत विनयभंग केल्याची कबुली दिली आहे.

Web Title: mumbai news crime youth arrested