दादरमध्ये घडताहेत दुर्गा- अंबेच्या मूर्ती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

दादर - गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सवाची लगबग सर्वत्र सुरू झाली आहे. गणेशोत्सवासाठी आकर्षक व सुबक मूर्तींसाठी परळमधील वर्कशॉपमध्ये भाविक गर्दी करतात. त्याचप्रमाणे नवरात्रोत्सवासाठी दुर्गा व अंबेमातेच्या मूर्तींसाठी दादरमधील पाल वर्कशॉपमध्ये भाविकांची गर्दी असते. शिवाजी पार्क येथील महापालिकेच्या मैदानात ४० वर्षांपूर्वी कोलकात्याचे मूर्तिकार निमाय पाल यांनी सुरू केलेल्या या वर्कशॉपमधील मूर्तींना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. निमाय पाल यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा अमित या कार्यशाळेचे कामकाज पाहतो.

शिवाजी पार्क येथील महापालिकेच्या मैदानावर ४० वर्षांपूर्वी निमाय पाल यांनी मुंबईतील बंगाली भाविकांना दुर्गेच्या आकर्षक व सुबक मूर्ती मिळाव्यात यासाठी वर्कशॉप सुरू केले. या कार्यशाळेत सध्या साडेतीन फुटापासून ते १४ फूट उंचीच्या मूर्ती तयार करण्यात येतात. मुंबईत अनेक ठिकाणी दुर्गा मातेच्या मूर्तींची प्रतिष्ठापणा केली जाते. त्यापैकी बऱ्याचशा मूर्ती शिवाजी पार्कच्या या कार्यशाळेत तयार केल्या जातात. मुंबई शहरासह उपनगरातील मंडळेदेखील या वर्कशॉपमधूनच मूर्ती बनवून घेतात. अंधेरी, ठाणे, मालाड, बोरिवली, वांद्रे, अँटॉप हिल व परेल या ठिकाणी या मूर्तींची प्रतिष्ठापणा करण्यात येते. दरवर्षी दुर्गामातेच्या ५० मूर्ती व अंबेमातेच्या २० मूर्ती अशा किमान ७० मंडळांच्या मूर्ती या वर्कशॉपमध्ये बनविण्यात येतात. या मूर्तींची किंमत साधारण ५० हजार ते तीन लाखांपर्यंत आहे. पाच वर्षांपासून या वर्कशॉपमधून श्रीलंकेला सहा फूट उंच दुर्गामातेची मूर्ती पाठविण्यात येते.

पाल यांच्या वर्कशॉपमध्ये शिवाजी पार्क मैदानातील प्रसिद्ध बंगाली देवी, सांताक्रूझच्या नवदुर्गा मित्र मंडळ, रानी मुखर्जींच्या सोसायटीची मूर्ती, अभिजित भट्टाचार्य यांच्या सोसायटीची मूर्ती तसेच अनेक बंगाली सिनेकलाकारांच्या घरांतील व सोसायटीच्या देवीच्या मूर्ती येथे बनवण्यात येतात, अशी माहिती कार्यशाळेतील मुख्य मूर्तिकार उत्तम पाल यांनी दिली.

कोलकात्यावरून आणतात कारागीर
पाल कार्यशाळेत मूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकार खास कोलकात्याहून आणण्यात येतात. कलाकारांना जागेची वानवा भासू नये यासाठी महापालिका दरवर्षी कलाकारांना जागा उपलब्ध करून देते. या वर्षी कोलकात्याहून २० कलाकार मुंबईत आले आहेत. तीन महिन्यांपासून मूर्ती बनवण्याचे काम सुरू आहे. सध्या कलाकार मूर्तींवर शेवटचा हात फिरवत आहेत.

Web Title: mumbai news dadar durga Navratri