मुंबईत बॉंबस्फोटाची दाऊदची धमकी?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

दाऊदच्या मालमत्तांचा 2002 व 2015 मध्येही लिलाव झाला होता. त्या वेळी दाऊदची मोटार खरेदी करून नंतर जाळणाऱ्या स्वामी चक्रपाणी यांना ठार करण्यासाठी छोटा शकीलने हस्तकांना पाठवले होते.

मुंबई : ''कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तांच्या लिलाव केल्यामुळे दाऊद भडकला आहे. ही मालमत्ता कोणी ताब्यात घेतल्यास मुंबईत 1993 स्फोटांची पुनरावृत्ती करू, मुंबईत बॉंबस्फोट घडवू,'' अशी धमकी त्याच्या कथित साथीदाराने दिली आहे.

दाऊदच्या मुंबईतील तीन मालमत्तांचा लिलाव मंगळवारी (ता.14) करण्यात आला. यानंतर उस्मान चौधरी नावाच्या व्यक्तीने एका वृत्तवाहिनीला दूरध्वनी करून 'आपण दाऊदचा माणूस असल्याचे सांगून कोणी या मालमत्ता ताब्यात घेतल्यास 1993 स्फोटांची पुनरावृत्ती करू,' अशी धमकी दिली. वृत्त वाहिनीच्या प्रतिनिधीने या धमकीची माहिती मुंबईतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली आहे. या माहितीनंतर पोलिस सावध झाले आहेत.

दाऊदच्या या कथित साथीदाराने आणखी कोणाला मालमत्ता लिलावप्रकरणी धमकी दिली आहे का, याची माहिती घेण्यात येत आहे. ही धमकी दाऊद टोळीकडूनच देण्यात आली की कोणीतरी खोडसाळपणा केला, याची पडताळणीही पोलिस करीत आहेत.

दाऊदच्या मालमत्तांचा 2002 व 2015 मध्येही लिलाव झाला होता. त्या वेळी या मालमत्ता अन्य कोणीही खरेदी करून नयेत, असे छोटा शकीलने या दाऊदच्या साथीदाराने सांगितले होते. या लिलावात सहभागी व्यक्तींनाही धमकावण्यात आले होते. त्या वेळी दाऊदची मोटार खरेदी करून नंतर जाळणाऱ्या स्वामी चक्रपाणी यांना ठार करण्यासाठी छोटा शकीलने हस्तकांना पाठवले होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: mumbai news dawood ibrahim threatens mumbai blasts