सुटका केलेल्या कोल्ह्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

मुंबई - विक्रोळीतील गोदरेज कंपनीच्या परिसरातून बुधवारी (ता. 24) सुटका केलेल्या गोल्डन जॅकेल जातीच्या कोल्ह्याचा गुरुवारी मध्यरात्री मृत्यू झाला.

मुंबई - विक्रोळीतील गोदरेज कंपनीच्या परिसरातून बुधवारी (ता. 24) सुटका केलेल्या गोल्डन जॅकेल जातीच्या कोल्ह्याचा गुरुवारी मध्यरात्री मृत्यू झाला.

अन्ननलिकेत मासांचा तुकडा अडकल्याने कोल्ह्याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. गोदरेज परिसरातील खड्ड्यातून बुधवारी सायंकाळी एका प्राणिमित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्ह्याची सुटका केली होती. त्यानंतर त्याला बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले. खूप दिवसांपासून उपासमार झाल्याने तो अशक्त झाला होता; परंतु उद्यानात अन्न मिळू लागल्यानंतर त्याची प्रकृती सुधारत होती. त्याने गुरुवारी रात्री चिकनवर ताव मारला. त्या वेळी त्याच्या अन्ननलिकेत चिकनचा तुकडा अडकला असावा, असे राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले.

Web Title: mumbai news death of freed fox