तिकीट तपासनीसाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

 रबाळे रेल्वे स्थानकातील जिन्यावर तिकीट तपासणीचे  काम करत असताना कदम यांना  एका प्रवाशाने धक्का दिल्यामुळे ते खाली पडले. त्यांच्या डोक्याला  गंभीर दुखापत झाली असल्याने  त्यांना  डोंबिवलीच्या  एका खाजगी  रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते

डोंबिवली - 8 दिवसांपूर्वी रबाळे  रेल्वे स्थानकात प्रवाशाने धक्का दिल्यामुळे तिकीट तपासणीस आर.जी.कदम  हे गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना  डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात  उपचारासाठी दाखल केले करण्यात आले होते. मात्र, आज (सोमवार) पहाटे त्यांचा मृत्यू झाला. 

 रबाळे रेल्वे स्थानकातील जिन्यावर तिकीट तपासणीचे  काम करत असताना कदम यांना  एका प्रवाशाने धक्का दिल्यामुळे ते खाली पडले. त्यांच्या डोक्याला  गंभीर दुखापत झाली असल्याने  त्यांना  डोंबिवलीच्या  एका खाजगी  रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.  

कदम यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, ते कोमात  गेले होते. अखेर सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

Web Title: mumbai news: death of tc

टॅग्स