विद्यापीठातून 'मेरिट ट्रॅक'ला हद्दपार करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

दिवाळीनंतर राज्यपालांनी कुलगुरू डॉ. देशमुख यांच्यावर निकालांतील दिरंगाईचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई केली. याचे विद्यार्थी तसेच प्राध्यापक संघटनांनी स्वागत केले आहे. पण मेरिट ट्रॅक कंपनीवर अद्याप कारवाई न झाल्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे, असे स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या निकालातील गोंधळाबाबत चौकशी करून कडक कारवाई झाली पाहिजे.

मुंबई - मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या हकालपट्टीनंतर आता "मेरिट ट्रॅक' कंपनीलाही विद्यापीठातून हद्दपार करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ऑनस्क्रीन असेसमेंटच्या गोंधळाला मेरिट ट्रॅक कंपनीही कारणीभूत असल्याने या कारवाईला कधी मुहूर्त मिळणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

दिवाळीनंतर राज्यपालांनी कुलगुरू डॉ. देशमुख यांच्यावर निकालांतील दिरंगाईचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई केली. याचे विद्यार्थी तसेच प्राध्यापक संघटनांनी स्वागत केले आहे. पण मेरिट ट्रॅक कंपनीवर अद्याप कारवाई न झाल्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे, असे स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या निकालातील गोंधळाबाबत चौकशी करून कडक कारवाई झाली पाहिजे.

डॉ. देशमुखांनी नियुक्त केलेल्या व्यक्तींबाबतही चौकशी करावी, अशी मागणी पवार यांनी राज्यपालांकडे केली आहे. अद्याप तीन हजार 600 उत्तरपत्रिका विद्यापीठाला सापडलेल्या नाहीत. त्यामुळे या सर्व गोंधळास देशमुखांसह मेरिट ट्रॅक कंपनीही कारणीभूत असल्याचे पवार यांनी पत्रात लिहिले आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही राज्यपालांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र कुलगुरूंनी कंत्राटी पद्धत राबवत मेरिट ट्रॅक कंपनीला दिलेल्या कंत्राटामागे नक्कीच गौडबंगाल आहे. त्याबाबत उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी विद्यार्थी परिषदेचे अनिकेत ओव्हाळ यांनी केली. ऑनस्क्रीन निकालाच्या पद्धतीमुळे विद्यापीठाच्या कारभाराला वर्षभराचा फटका बसल्याचे "बुक्‍टो' या संघटनेने म्हटले आहे.

Web Title: mumbai news Demand for the expulsion of 'merit track' from university