शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

मुंबई - कर्जमाफीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे राजकीय स्वरूपाचे आहेत. हे गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे मंत्री व आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गुरुवारी केली.

राज्यभरात शेतकऱ्यांनी आंदोलने करून हा प्रश्‍न धसास लावला. या जनक्षोभासमोर सरकारलाही नमते घ्यावे लागले. यानंतर सरकारने "छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना - 2017' जाहीर केली. त्यामुळे आंदोलनाच्या वेळी दाखल झालेले गुन्हे आता मागे घ्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे मंत्री दादा भुसे, आमदार सुनील प्रभू आदींनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली.

Web Title: mumbai news demand farmer crime back