स्वच्छतेत मुंबईला अव्वल बनवा -मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मुंबई - हेरिटेज वास्तू, जलस्रोत, जलसाठे, तलाव, पुतळे, पर्यटनस्थळे, स्वच्छतागृहे आदींची साफसफाई करण्यासाठी व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्धार पालिकेने व्यक्त केला. पालिकेच्या "स्वच्छता हीच सेवा' पंधरवडा अभियानाचा शुभारंभ नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. स्वच्छतेबाबत मुंबईला देशात अव्वल बनवा, यासाठी मुंबईकर आणि संस्थांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी. प्रत्येक व्यक्तीने स्वच्छतेसाठी दररोज पंधरा मिनिटे द्यावीत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले. 

केंद्र सरकारच्या "स्वच्छ भारत' अभियानांतर्गत पालिकेने मुंबईत 15 सप्टेंबर ते 2 ऑक्‍टोबरदरम्यान "स्वच्छता हीच सेवा' पंधरवडा अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाचा फोर्टमधील महात्मा जोतिबा फुले मंडई येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ झाला. मंडईच्या स्वच्छता अभियानात त्यांनी सहभाग घेतला. या वेळी उद्योगमंत्री आणि शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, आमदार राज पुरोहित, स्थानिक नगरसेविका सुजाता सानप, राज्य सरकारचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, पालिका आयुक्त अजोय मेहता, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने स्वच्छतेसाठी शहरांना क्रमांक देणे सुरू केले आहे. स्वच्छ अभियानांतर्गत राज्यात तसेच मुंबईत मोठ्या प्रमाणात स्वच्छतागृहे बांधली आहेत. त्यामुळे नागरिक आणि संस्था यांच्यात स्वच्छतेबाबत स्पर्धा निर्माण झाली पाहिजे. मंडया, उद्याने स्वच्छ ठेवावीत, प्रत्येक व्यक्तीने स्वच्छतेसाठी किमान 10 मिनिटे द्यावीत, तसे केल्यास मुंबई स्वच्छतेच्या बाबतीत मुंबई अव्वल झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कचऱ्याचे वर्गीकरण करण्याबाबत माहिती देणारे प्रदर्शनही या वेळी भरविण्यात आले होते. मुंबई शहर हे देशातील स्वच्छतेबाबत प्रथम क्रमांकाचे शहर ठरावे, यासाठी आजपासूनच प्रयत्न करू या, असे आवाहन पालकमंत्री देसाई यांनी केले. स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने हेरिटेज वास्तू, जलस्रोत, जलसाठे, स्वच्छतागृहे, पर्यटनस्थळे, पुतळे बस थांबे, तलाव आदी ठिकाणी स्वच्छता केली जाणार आहे. 

कचराकुंड्यांचे होणार वाटप 
शहरातील कुटुंबे, भाजी मंडई, बाजार संघटना, वाणिज्य क्षेत्रात ओल्या आणि सुक्‍या कचऱ्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या कचराकुंड्या वितरित करण्यात येणार आहेत. भाजी मंडई बाजाराची ठिकाणे आदी ठिकाणी व्यापाऱ्यांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबविली जाईल, अशी माहिती पालिकेने दिली.

Web Title: mumbai news devendra fadnavis Cleanliness