पत्रलेखनाच्या सवयीसाठी 'ढाई आखर' मोहीम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

मुंबई - पत्रलेखनाची सवय पुन्हा लागावी यासाठी "ढाई आखर' ही मोहीम देशभरात राबवण्यात येत आहे. "प्रिय बापू, तुमच्यापासून मला प्रेरणा मिळते' या विषयावर महात्मा गांधींना उद्देशून एक हजार शब्दांपर्यंत पत्र लिहिण्याचे आवाहन टपाल विभागाने केले आहे. केंद्रीय संचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी या मोहिमेची घोषणा नुकतीच केली.

पोस्टाने प्रसिद्ध केलेले अधिकृत पाकीट वापरून "ए 4' आकाराच्या कागदावर हे पत्र लिहायचे आहे. आंतर्देशीय पत्राचा वापर करून 500 शब्दांपर्यंतही पत्र लिहिता येईल. हे पत्र मुख्य पोस्टमास्तर जनरल (फिलाटेली), महाराष्ट्र सर्कल यांना पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुली आहे. स्पर्धेसाठी 18 वर्षांखालील, तसेच 18 वर्षांवरील असे दोन वयोगट आहेत. महाराष्ट्र सर्कल स्तरावर तीन सर्वोत्तम पत्रे निवडण्यात येतील. पाच हजारांपासून 25 हजारांपर्यंत रोख बक्षीस देण्यात येईल. विजेत्यांचा साबरमती आश्रमात 2 ऑक्‍टोबरला सत्कार करण्यात येईल. ही सर्वोत्तम पत्रे प्रदर्शनात मांडण्यात येतील.

Web Title: mumbai news dhai aakhar campaign for letter writing