दीपालीची मृत्यूशी झुंज अखेर संपली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

मुंबई - नायर दंत रुग्णालयात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणाऱ्या दीपाली लहमाटेचा अखेर शुक्रवारी (ता. 30) मृत्यू झाला. त्यानंतर याप्रकरणी दोषी महिलेवरील कलम 304 (अ) वाढवण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त (परिमंडळ-1) मनोजकुमार शर्मा यांनी दिली. या तरुणीला मरिन ड्राइव्ह भागात एका कारने धडक दिली होती. याप्रकरणी कारचालक महिलेला पोलिसांनी अटक केल्यानंतर तिला जामीन मिळाला होता.

दीपाली ही नायर रुग्णालयाच्या दंत महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होती. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेल्या भावाला भेटण्यासाठी दीपाली 24 मार्च रोजी जात असताना तारापोरवाला मत्स्यालयाजवळील सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगवर ती रस्ता ओलांडत होती. त्या वेळी लाल सिग्नल असतानाही एका पांढऱ्या होंडा सिटी कारने सिग्नल तोडला आणि दीपालीला जोरदार धडक दिली होती. ही कार शिक्षिका शिखा झवेरी चालवत होती. अपघातानंतर एका व्यक्तीने पाठलाग करून झवेरी यांना पुढील सिग्नलवर थांबवले. त्यानंतर तेथे उपस्थितांनी दीपालीला भाटिया रुग्णालयात दाखल केले होते.

Web Title: mumbai news dipali lahmate death