पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश यांचे आयरनमॅन स्पर्धेत यश

दिनेश चिलप मराठे
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

मुंबई: महाराष्ट्र राज्याचे विशेष पोलिस महासंचालक (VIP सिक्युरिटी) वरिष्ठ IPS अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी फ्रान्स येथे आयोजीत आंतरराष्ट्रीय आयरनमॅन ट्रायथोलन रेस 14 तासात जिंकत नविन विश्व विक्रम केला. त्या रेस मध्ये 186 किलोमीटर सायकलिंग, 42 किलोमीटर रनिंग आणि 4 किलोमीटर स्विमिंग हे अंतर 16 तासात पार पाडावयाचे होते. परंतु, हा टास्क कृष्ण प्रकाश यांनी 14 तासांत पूर्ण करीत जागतिक विक्रम प्रस्थापित करीत हिन्दुस्थानचा तिरंगा ध्वज जगात सन्मानाने फडकविला.

चित्रपट अभिनेता मिलिंद सोमन यांनीही असाच विक्रम या पूर्वी केलेला आहे. परंतु, भारतीय नागरी प्रशासकीय सेवेतील-पोलिस सेवेतील IPS अधिकारी जेंव्हा हा विक्रम करतो तेंव्हा तो पहिला विक्रमादित्य ठरतो. हाच विक्रम पाहिले भारतीय सिविल सर्विस मधिल अधिकारी म्हणून कृष्ण प्रकाश यांच्या नावे सुवर्णाक्षरानी भारतीय पोलिस सेवेतील इतिहासात सन्मानाने घेतला जाईल. असा पराक्रम करणाऱ्या या कवी मनाच्या खाकी वर्दीतील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने आयरन मॅन ही स्पर्धा जिंकताच भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा अभिमानाने फ्रान्समध्ये फडकावित चक दे इंडिया चा जय घोष केला. स्पर्धे दरम्यान त्यांनी जय भवानी, जय शिवाजी चा नारा देत स्वतःला स्फुरित केले. अशक्य असलेले हे आव्हान शक्य करताना मनात स्फुरण जागृत करण्यासाठी जय भवानी जय शिवाजीची घोषणा देत घेतलेली आघाडी टिकवित आयरन मॅन हि अत्यंत अवघड स्पर्धा जिंकत स्वतःला सिद्ध केले. त्यांची पत्नी आणि मुलगी यांनी त्यांना स्पेशल चिअर अप केले.

कृष्ण प्रकाश यांनी केलेल्या पराक्रमाची सर्वांना माहिती व्हावी म्हणून "युवा उत्थान फॉऊण्डेशन"च्या जयवंत यमकर, अमोल गवळी यांनी गेटवे ऑफ़ इंडिया मुंबई येथील रेडीयो क्लब येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. फ्रान्स येथे सराव आणि स्पर्धे दरम्यान आलेले अनेक अनुभव त्यांनी पत्रकारांसमोर व्यक्त करतांना त्यांनी स्वतः केलेल्या कविता सादर करीत साऱ्यांची वाहव्वा मिळविली.

आपल्या देश बांधवाना आणि खास करुन पोलिसात करियर करू इच्छिणाऱ्या तरुणांना त्यांनी प्रचंड कष्ट आणि प्रामाणिकपणे केलेला अभ्यास, निर्भय मैदानी सराव याचं आत्मविश्वासाने केलेला शारीरिक तंदुरुस्ती व्यायाम या जोरावर यश मिळविणे सहज शक्य होते असे ते म्हणाले. वयाच्या चाळीशी नंतरही वेळात वेळ काढावा व्यायाम, योगा, चालणे आणि आपल्याला असलेल्या चांगल्या छंदाची जोपासना करा. तनाव मुक्त जीवन जगा. चांगले बोला, चांगले वागा चांगले विचार आत्मसात करा. तुम्ही जीवनात कधीच निराश होणार नाही. अपयश आल्यास त्यावर मात करीत पुनश्च लढन्याची जिंकण्याची विजिगीषु लढावु वृती जन्मास येत आपले जीवन आनंदी करते, असा सल्लाही त्यांनी दिला.

Web Title: mumbai news Director General of Police Krishna Prakash win Iron Man Championship