गिरगावात साकारणार आठ फुटांचा राजगड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

आठ फुटांच्या राजगडाबरोबरच विजयदुर्ग, हरिहर, प्रतापगड, शिवनेरी आदी अनेक किल्ल्यांच्या प्रतिकृती विविध संस्था अन्‌ विद्यार्थ्यांकडून उभारण्यात येणार आहेत. त्यानिमित्त शिवशाहीचा देदीप्यमान इतिहास लहानांपासून नव्या पिढीसमोर मांडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे व्यंगचित्र, छायाचित्र व किल्ले स्पर्धा घेण्यात येणार आहे

मुंबई -  दिवाळी आणि किल्ले असे समीकरणच बनून गेले आहे. महाराष्ट्राच्या वैभवशाली शिवकालीन किल्ल्यांचे वैभव दिवाळीनिमित्त त्यांच्या प्रतिकृतींतून मुंबईकरांना पाहता येणार आहे. मातीचे तब्बल सहा फुटी किल्ले गिरगावमध्ये उभारण्यात येणार आहेत. मुले आठ फुटी राजगड किल्ला बनवणार आहेत.

"गिरगाव प्रबोधन'च्या वतीने दर वर्षी किल्ले स्पर्धा होतात. मुंबईकरांचे ते आकर्षण ठरते. यंदाचे तिसरे वर्ष आहे. आठ फुटांच्या राजगडाबरोबरच विजयदुर्ग, हरिहर, प्रतापगड, शिवनेरी आदी अनेक किल्ल्यांच्या प्रतिकृती विविध संस्था अन्‌ विद्यार्थ्यांकडून उभारण्यात येणार आहेत. त्यानिमित्त शिवशाहीचा देदीप्यमान इतिहास लहानांपासून नव्या पिढीसमोर मांडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे व्यंगचित्र, छायाचित्र व किल्ले स्पर्धा घेण्यात येणार आहे. गिरगावमधील शारदा सदन शाळेमध्ये 28 व 29 ऑक्‍टोबर रोजी किल्ल्यांचे प्रदर्शन मुंबईकरांना पाहता येणार आहे.

बनवण्यात आलेले किल्ले शाळांमध्ये कायमस्वरूपी जतन करण्यात यावेत म्हणून "गिरगाव प्रबोधन'तर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत.

Web Title: mumbai news: diwali festival forts