वर्षभरात १५ हजार  जणांना श्‍वानदंश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

बेलापूर -  नवी मुंबई शहरात भटक्‍या श्‍वानांची दहशत वाढली असून गेल्यावर्षी १५ हजार २०० नागरिकांना श्‍वानदंश झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. श्‍वानदंश झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी लस खरेदी करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी आला होता. त्याला सर्वानुमते मंजुरी मिळाली. त्यानुसार एक कोटी २० लाख ९१ हजारांची लस खरेदी करण्यात येणार आहे.

शहरात भटक्‍या श्‍वानांनी उच्छाद मांडला आहे. श्‍वानदंशाच्या अनेक घटना शहरात घडल्या असून महापालिकेमार्फत मोफत लस दिली जाते. गेल्या वर्षी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध न झाल्याने प्रसिद्धी माध्यमांनी पालिकेच्या आरोग्य विभागाचे वाभाडे काढले होते. जुईनगर येथे रेबीजची लागण झालेल्या श्‍वानाने चार जणांचा चावा घेतला. या चाव्याची जखम मोठी व खोल असेल तर रेबीज सिरम ही लस द्यावी लागते. जुईनगरमध्ये श्‍वानाने सात वर्षांच्या मुलाच्या गालाचा चावा घेतला होता. त्याला रेबीज सिरम ही लस नवी मुंबई पालिका रुग्णालयात मिळाली नाही. त्यामुळे त्याला मुंबईतील सायन रुग्णालयात न्यावे लागले होते. रेबीज सिरम ही लस जास्त दिवस टिकत नसल्याने ती रुग्णालयात ठेवली जात नसल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले होते. नवी मुंबईत गेल्यावर्षी भटक्‍या श्‍वानांनी चावा घेतल्याच्या १५ हजार १९९ घटना घडल्या. गेल्या वर्षी झालेल्या श्‍वानदंशाच्या १० टक्के वाढ गृहित धरून या आर्थिक वर्षाकरिता लस खरेदी करण्यात येणार आहे. एका रुग्णाला लसीचे तीन डोस द्यावे लागतात. त्यानुसार ही लस खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी एक कोटी २० लाख ९१ हजार एवढा खर्च येणार आहे.

Web Title: mumbai news Dog bite belapur