डोंबिवलीत भरवस्तीत अग्नितांडव; साडेचार तासानंतर आग आटोक्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

डोंबिवली: डोंबिवली स्थानकाजवळ असलेल्या वीरा शॉपिंग सेंटरमध्ये आज (शनिवार) दुपारी आग लागल्याची घटना घडली. भरवस्तीत लागलेल्या आगीमुळे ही आग आटोक्यात आणताना अग्निशामक दलाची दमछाक झाली. तब्बल साडेचार तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

डोंबिवलीतील उर्सेकर वाडीमध्ये दाट वस्तीत असलेल्या वीरा शॉपिंग सेंटरमध्ये तिसऱ्या मजल्यावर सेठिया प्रिंटिंग प्रेस आणि बाजूलाच असलेल्या कपड्याच्या गोदमाला आज दुपारी 12च्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच इमारतीतील नागरिकांनी घाबरून बाहेर पळ काढला.

या प्रकाराची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान, आगीने उग्र रूप धारण केले होते. कापडाच्या गोडाऊनमध्ये कापड असल्याने तसेच प्रिंटिंग प्रेस मध्ये रबर, कागद, प्लॅस्टिक आदी वस्तू असल्यामुळे मोठया प्रमाणात धूर निर्माण होऊन आयरेगावपर्यंत पोहचला होता.

दरम्यान, अत्यंत दाट वस्तीत ही आग लागल्यामुळे अग्निशामक दलाच्या बचाव कार्यात अडथळा निर्माण होत होता. बघ्यांची गर्दी झाल्यामुळे त्यांना हटविताना पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Web Title: mumbai news dombivli fire in residential area