"ओखी'मुळे चैत्यभूमीवर विशेष दक्षता 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

मुंबई - महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबई पोलिसांनी दादर येथील चैत्यभूमीवर एक हजार पोलिसांसह राज्य राखीव पोलिस दलाच्या अतिरिक्त तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. ओखी वादळाच्या पार्श्‍वभूमीवर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने विशेष दक्षताही घेण्यात येत आहे. 

मुंबई - महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबई पोलिसांनी दादर येथील चैत्यभूमीवर एक हजार पोलिसांसह राज्य राखीव पोलिस दलाच्या अतिरिक्त तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. ओखी वादळाच्या पार्श्‍वभूमीवर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने विशेष दक्षताही घेण्यात येत आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्या (ता. 6) महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त देशभरातून हजारो अनुयायी दादर चैत्यभूमी येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या ठिकाणी एक अतिरिक्त पोलिस आयुक्त, पाच पोलिस उपायुक्त, सहा सहायक पोलिस आयुक्त, 100×पोलिस अधिकारी आणि एक हजार पोलिस कर्मचाऱ्यासह, बॉम्बनाशक पथक, श्वानपथक, दंगलविरोधी पथक, राज्य राखीव दल आणि इतर पथके बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय सीसी टीव्हीने सुसज्ज वाहनेही परिसरात तैनात करण्यात आली आहेत. 

चैत्यभूमीवर "नो फ्लाईंग झोन' 
चैत्यभूमीवर सुरक्षेसाठी "नो फ्लाईंग झोन' घोषित करण्यात आले आहे. परिसरात कोणतेही विमान अथवा ड्रोन किंवा हेलिकॉप्टरवर बंदी घातली आहे. यादरम्यान हलिकॉप्टरच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यासाठी नियम शिथिल असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

अनुयायांच्या मदतीसाठी कुमक 
ओखी वादळामुळे पावसाने मंगळवारी मुंबईला झोडपून काढले. वादळामुळे पोलिसांनी किनारी मार्गावरील सुरक्षेत या वर्षी वाढ केली आहे. नागरिकांना समुद्रात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि पावसामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांचे हाल होऊ नयेत, यासाठी राज्य राखीव दलाच्या चार तुकड्या तैनात आहेत. 

Web Title: mumbai news Dr. babasaheb ambedkar Mahaparinirvan Din Chaitya Bhoomi